Mumbai Goa Traffic : गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाकडे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणाकडे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. पण, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहानांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
कशेडी घाटात कोकणात जाणाऱ्या दोन बसचा मोठा अपघात; कंटेनरनं अचानक ब्रेक मारल्यामुळे दुर्घटना
Kashedi Bogda Accident : कल्याण : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 80 प्रवासी होती. पण सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
