एक्स्प्लोर
Construction Site Negligence | जोगेश्वरीमध्ये Cement Block पडून तरुणीचा मृत्यू, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून सिमेंटचा ब्लॉक पडून २२ वर्षीय संस्कृती कोटियन या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मजसवाडी परिसरात कामावर निघालेल्या संस्कृतीच्या डोक्यात हा सिमेंटचा ब्लॉक पडला. संस्कृती कोटियन सात दिवसांपूर्वीच RBL बँकेत नोकरीला लागली होती. ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रद्धा कन्स्ट्रक्शन या इमारतीमध्ये ही घटना घडली. विकासकाकडून आजूबाजूला सुरक्षा जाळी लावण्यात आलेली नाही, त्यामुळे याआधी देखील अशा घटनांमध्ये अनेकांना दुखापत झाली, पण प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. एका स्थानिकाने बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले असून, लहान मुले आणि वयोवृद्धांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. बिल्डरने लावलेली सुरक्षा जाळी निरुपयोगी असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. मेघवाणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बांधकाम साईटवरील काही कामगारांना ताब्यात घेतले आहे. यामुळे बांधकाम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















