MPSC : MPSC परीक्षेचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; मुलाखतीनंतर दोन तासात निकाल घोषित
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी कडून आज मुलाखती नंतर दोन तासातच निकाल घोषित करण्यात आलाय. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुख्य परिक्षा झालेल्या दोनशे पदांसाठी या निकालाच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्यात आलीय. 4, 5 आणि 6 डिसेंबरला उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक , तहसीलदार इत्यादी पदांसाठी मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. या मुख्य परिक्षेतुन निवड झालेल्या उमेदवारांना आज मुलाखतींसाठी आयोगाकडून बोलावण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुख्य परिक्षेतील गुणांची यादी लोकसेवा आयोगाकडून आधिच तयार ठेवण्यात आली होती. आज मुलाखती झाल्यानंतर मुलाखती घेणाऱ्या पॅनलकडून देण्यात आलेल्या गुणांची बेरीज मुख्य परिक्षेतील गुणांसोबत करण्यात आली आणि अवघ्या दोनच तासांमधे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर परिक्षा उशिरा घेत असल्याबद्दल आणि परिक्षांचा निकाल उशीरा लावत असल्याबद्दल मागील काळात सातत्याने टिका करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आपली कार्यशैली बदलल्याच दिसून आलय