एक्स्प्लोर
MPSC Exam Postponed | अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाहीर
राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता २८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृतपणे ही माहिती जाहीर केली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















