Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार, राज ठाकरेंचा कुणावर निशाणा? :ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. निमित्त आहे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं. मनसेचा गुढीपाडवा मेळावा उद्या शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता. याआधी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. पण २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं उद्याच्या मेळाव्या राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

















