एक्स्प्लोर
Bacchu Kadu Protest : बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम, मुंबईत जाणार नाही
नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. 'भलेही तुम्ही कर्जमाफीची अंमलबजावणी नंतर करा पण जीआर तरी आता काढा', अशी थेट मागणी बच्चू कडूंनी सरकारकडे केली आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह (NH-44) अनेक प्रमुख रस्ते बंद झाले असून, गेल्या वीस तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली आहे. सरकार चर्चेसाठी तयार असले तरी, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि सरकार स्वतः आंदोलनस्थळी येत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा कडूंनी घेतला आहे. या आंदोलनात संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या इतर २२ मागण्यांचा समावेश आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
बीड
राजकारण
Advertisement
Advertisement
















