Miraj Voting Issue : 1500 मतदारांसाठी एकच मशीन; नागरिकांचे उन्हामुळे हाल
Miraj Voting Issue : 1500 मतदारांसाठी एकच मशीन; नागरिकांचे उन्हामुळे हाल. सांगलीमध्ये मतदान सुरू आहे. मात्र कडाक्याचं उन्हाळा असल्यामुळे मतदार राजाचे हाल होताना पाहायला मिळत आहे. गुरुवार पेठेमध्ये मतदान सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाने कुठलीही व्यवस्था केली नसल्याची तक्रार मतदारांची आहे. त्याच सोबत एवढी लोकसंख्या असताना एकच मशीन ठेवलेली आहे. त्यामुळे तासान तास ताटकळत रांगेत उभ राहावं लागत आहे. वयोवृद्ध मतदारांनाही पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार केली आहे. तासनतास रांगेत थांबल्यानंतर ही मतदान आज पुर्ण होणार नसल्याच स्थानिकांनी म्हटल आहे. प्रशासन जाणीवपूर्वक या गोष्टी करत आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय....




















