Mira Road Bunty Babli : पुरुषाचा आवाज काढून फसवलं,बंटी फरार...बबलीवर कारवाई
४३ लाखाच वर्षाच पॅकेज असणारी नोकरी देण्याच्या नावाखाली, पुरुषाच आवाज काढून, साढे सहा लाखाची फसवणूक करणा-या मिरा रोडच्या बंटी बबलीवर काशिगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिलेचा पती फरार आहे. तर महिला आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिरा रोडच्या काशिगाव येथील अपना घर फेज ३ येथील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदार ऐनी धैर्यमनी हिचे तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या आरोपी रश्मी सजल कर आणि तिचा पती सजल कर हिच्याबरोबर ओळख झाली. या दोघां बंटी बबलीने ऐनीला एका मोठ्या कंपनीत ४३ लाखाच पॅकेज असणारी नोकरी देतो असं सांगून, तिची ओळख अभिमन्यू मेहरा याच्याशी फोनद्वारे केली. माञ पुरुषाच आवाज काढून रश्मीच अभिमन्यूनच्या नावाने फोनद्वारे ऐनीचा विश्वास संपादन करुन, तिला नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं, तर तिच्याशी लग्न ही करण्याचे आश्वासन दिलं. आणि ६,६०,००० रुपये घेतले. नोव्हेंबर २०२२ पासून हा प्रकार सुरु होता.
आरोपी रश्मी ही पुरुषाचा आवाज काढून अभिमन्यू नावाने आपली फसवणूक करीत असल्याच ऐनी ला समजल्यावर ऐनी ने दिनांक २६ जुलै रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात रश्मी आणि तिचा पती सजल याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी रश्मी ला पोलिसांनी अटक केली आहे. तर रश्मीचा पती सजल कर हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.