कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात अर्धा किलो सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची काँग्रेसनं कुंडली मांडली!
कोणाला लाभाची पदे मिळाली याची माहिती काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट मालिका करत दिली आहे. यामध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या हरदीप पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांचाही समावेश आहे.

Congress Show charges against 272 retired judges and bureaucrats: देशभरातील 272 निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहांनी निवडणूक आयोगावर कथित मतदान हेराफेरीचा आरोप करत एक खुले पत्र जारी केले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तुम्ही आयोगाची प्रतिमा मलिन करताय असा आरोप केला होता. या पत्रावर 16 माजी न्यायाधीश, 123 निवृत्त नोकरशह (14 माजी राजदूतांसह) आणि 133 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होता. काँग्रेस आयोगासारख्या संवैधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, देशाच्या लोकशाही व्यवस्थेत अनावश्यक अविश्वास पसरवत आहे, असे या पत्रात म्हटले होते.
272: ‘प्रतिष्ठित’ भ्रष्टाचारियों की सूची
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 21, 2025
भ्रष्टाचार के गंभीर आरोपी राहुल गांधी के खिलाफ़ चिट्ठी लिख रहे हैं
सज़ा से बचने के लिए लोकतंत्र के सिपाही पर हमला कर रहे हैं
1) जस्टिस एस.एन. ढींगरा
कोर्ट द्वारा नियुक्त पर्यवेक्षक के पद का दुरुपयोग, बदले में लाभ (quid pro quo) लिया… pic.twitter.com/jlmQruSq5k
आता काँग्रेसने त्या 272 जणांमधील कर्तव्यावर असताना विविध आरोपांखाली सापडलेल्या कुंडलीच सोशल मीडियात मांडली आहे. यामध्ये कोणावर कोणता आरोप झाला. लाभाची पदे मिळाली याची माहिती काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विटची मालिका करत दिली आहे. यामध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या हरदीप पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांचाही उल्लेख श्रीनेत यांनी केला आहे.
272 : ‘प्रतिष्ठित’ संघी
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 21, 2025
विवेकानन्द फाउंडेशन, इंडिया फाउंडेशन, RSS और VHP से जुड़े लोगों ने राहुल गांधी के ख़िलाफ़ चिट्ठी लिखी
कोई विश्वसनीयता नहीं है इन लोगों की
1) प्रभात शुक्ला, पूर्व राजदूत - विवेकानंद फाउंडेशन
2) अनिल त्रिगुणायत, पूर्व राजदूत - विवेकानंद फाउंडेशन… pic.twitter.com/kgcPl6fdB9
आदर्श कुमार गोयल आयबीच्या अहवालात भ्रष्ट
श्रीनेत यांनी म्हटलं आहे की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. ते एक वकील होते आणि 2001 मध्ये आयबीच्या अहवालात भ्रष्ट ठरवण्यात आले असले तरी, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. 2018 मध्ये मोदी सरकारने त्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. हरियाणातील खट्टर सरकारने त्यांच्या मुलाला लाखो रुपये मासिक पगारासह अतिरिक्त अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले. त्यांनी त्यांचे कर्ज फेडण्यासाठी राहुल गांधींविरुद्ध पत्र लिहिले आहे. तसेच यामधील 10 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही श्रीनेत यांनी म्हटलं आहे
272 ‘EMINENT’ people have criticised Leader of the Opposition @RahulGandhi for exposing Vote Chori and raising pertinent questions before the Election Commission.
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 21, 2025
So who are these eminent people? Why are they not worried about glaring proof of voter fraud that Rahul Gandhi has… pic.twitter.com/zPUe6ZnWYs
यामध्ये खालील 10 जणांचा भाजप प्रवेश
1) न्यायमूर्ती पी.एन. रवींद्रन
2) संजीव त्रिपाठी, माजी रॉ प्रमुख
3) अय्यर कृष्णा राव, माजी मुख्य सचिव (आंध्र प्रदेश)
4) भास्वती मुखर्जी, माजी राजदूत
5) टी.पी. सेनकुमार, केरळचे माजी डीजीपी
6) निर्मल कौर, झारखंडचे माजी डीजीपी
7) बी.एच. अनिलकुमार, माजी मुख्य सचिव (कर्नाटक)
8) भास्कर राव, कर्नाटकचे माजी अतिरिक्त डीजीपी
9) लेफ्टनंट जनरल डी.पी. वत्स
10) मेजर जनरल पी.सी. खरबंदा
इतर महत्वाच्या बातम्या























