Marathwada Drought : मराठवाड्यातली धरणं कोरडी ! पावसाळ्यातही टँकरवर तहान
जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील धरणं तळालाच
जायकवाडीसह,येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यात वाढ नाही
पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत जायकवाडी सह लोअर दुधना,येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणी साठा झालेला नाही त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते.आता यंदाच्या पावसाळयाचे 73 दिवस शिल्लक आहेत याच दिवसांत पाऊस चांगला पडून हे प्रकल्प भरणार का असा प्रश्न निर्माण झालाय जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही केवळ 5.60% एवढाच पाणी साठा असलेल्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मराठवाड्यातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी...























