(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Visit Raigad : आधी शिवरायांच्या समाधीचं दर्शन मग मनोज जरांगे घरी परतणार
Manoj Jarange Visit Raigad : आधी शिवरायांच्या समाधीचं दर्शन मग मनोज जरांगे घरी परतणार
मनोज जरांगे पहाटे रायगडमध्ये पोहोचले, सकाळी दहा वाजता शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार.
Manoj Jarange, Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिलेला लढा यशस्वी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra News) मराठा बांधवांनी (Maratha Samaj) आंनदोत्सव साजरा केला. या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती, मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी. तब्बल 5 महिने आणि 3 दिवस आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी झटत होते, अखेर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. आज मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडमध्ये दाखल झाले आहेत. शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे आपल्या घरची म्हणजेच, आंतरवली सराटीची वाट धरणार आहेत. आणि तब्बल 5 महिने आणि 3 दिवसांनी मनोज जरांगे आपल्या घरी परतणार आहेत.