(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange On Opposition : शरद पवार, ठाकरे आणि पटोलेंनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी- जरांगे
Manoj Jarange On Opposition : शरद पवार, ठाकरे आणि पटोलेंनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी- जरांगे
Manoj Jarange : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे. आमचं मूळ गाव आहे तिथे दर्शनासाठी जाणार आहे. आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. सरकारशी बोलणं झालं नाही, पाऊस सुरू आहे, ते त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणुक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे, पवार, पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा...
ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा त्यांनी भाजपचा नेत्यांना दिलाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, विरोधकांची वाट पाहू नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.