(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Meets Dhangar Protester : जरांगे पाटील यांनी घेतली उपोषणकर्ते ओबीसी बांधवांची भेट
लातूर शहरात मागील १२ दिवसापासून धनगर समाजाच्या दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषणास बसलेल्या दोघांत तरुणांची प्रकृती खालावली आहे.आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.. त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून जरांगे पाटील हे उपोषण स्थळी दाखल झाले आहेत... सर्वप्रथम या भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे. जो सत्य मार्ग असेल त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत...समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी पुढे आलेच पाहिजे ..असे सांगत मनोज जरंगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या काय आहेत तो विषय समजावून घेतला...हे संपूर्ण निवेदन वाचून घेतो..यावर मग आपण सविस्तर बोलू असे ही सागितले....काही काळजी करू नका सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील...असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.