Maharashtra Unseasonal Rain : राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका
एकीकडे संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना दुसरीकडे निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय.. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय.. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान केलंय...जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी,गहू, हरभरा आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय.. भुसावळ, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात जोरदार वादळी वारा झाल्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झालंय.. तर धुळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर गारपीटही झाली...
अहमदनगरच्या पारनेरमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपाटीमुळे गहू, कांदा पिकांचं नुकसान होणार असल्याने शेतकऱी चिंतेत आहे.. या अवकाळी पावसाचा आंबा ,काजू पिकांनाही फटका बसतोय.. झाडांना आलेला मोहर गळू लागलाय तर झाडावर तयार झालेली फळही गळायला सुरुवात झालीये.. त्यामुळे ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचं पाहायला मिळालं...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
