Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP Majha
नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार, देश-परदेशातील आठ हजार मान्यवरांना निमंत्रण
प्रफुल पटेल उद्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार, नवी दिल्लीत फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब
((प्रफुल पटेल पुन्हा केंद्रीय मंत्री होणार))
शिंदे गटाला ४ मंत्रिपदं तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरुन संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल, तर उरलेल्यांना परदेशात हायकमिशनर नेमणार, राऊतांचा टोला
राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनवा, दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखी मागणी, पुढील रणनीतीवरही चर्चा
राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा
राजीनामा देणार... सोनिया गांधींच्या सल्ल्यानंतर निर्णय, रायबरेलीचं प्रतिनिधित्व राहुल गांधी कायम ठेवणार
ठाकरे गटाचे दोन नवे खासदार संपर्कात, हे दोन खासदार आणखी चार खासदारांना घेऊन येणार,खासदार नरेश म्हस्के यांचा दावा, म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य
(('...तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू'))
अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु, आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा, सरकारला सावधगिरीचा इशारा
पुणे अपघातातील पोर्श कारचं क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करणार, लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेणार पुणे पोलीस
(('त्या' कारचं इम्पॅक्ट अॅनालिसिस करणार))
आळंदी प्रस्थानावेळी प्रति दिंडी ९० वारकऱ्यांना प्रवेश, वारकरी-पोलीस झटापटीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
रशियामध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, निशा सोनावणे ही विद्यार्थिनी अत्यवस्थ, वोल्खोव नदीत पोहताना दुर्घटना
((राज्यातील चार तरुणांचा रशियात अंत))
ईटीव्ही आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन, शासकीय इतमामात देणार अखेरचा निरोप





















