Maharashtra SuperFast : बातम्यांचा वेगवान आढावा : महाराष्ट्र सुपरफास्ट : 12 June 2024 : 6.30 PM
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 12 June 2024 : 6.30 PM
1. 'चार, सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे' ---------- इंदापूरमध्ये पाहणी दौऱ्यावेळी शरद पवारांचं वक्तव्य --------- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, ग्रामस्थांची बातचीत करताना शरद पवारांचं वक्तव्य
2. ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेतेही अंतरवाली सराटी इथे प्राणांतिक उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी यांच्या उपोषणस्थळाजवळच ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण सुरू करणार आहेत. ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये या मागणीसाठी ते अंतरवालीतच आता उपोषणाला बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड इथे ओबीसी बांधवांची मीटिंग होणार आहे. गावांचा दौराही केला जाईल असं हाके यांनी म्हटलंय
3 . उशिरा होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेचा परीक्षार्थींना फटका बसणार.. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती परीक्षेचा मुद्दा लांबणीवर