Maharashtra Remote Sensing Application Centre : धोकादायक ठिकाणाचं मॅपिंग केव्हा होणार?
सरकारने परवानगी दिली तर एका वर्षाच्या आत आम्ही राज्यातील दरड कोसळण्यासंदर्भातल्या संभाव्य धोकादायक ठिकाणांचा डिटेल मॅपिंग करून सरकारला सोपवू शकतो, असा दावा महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर म्हणजेच MRSAC च्या संचालकांनी एबीपी माझाला दिलीय. धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागासोबत याच विषयावर MRSAC च्या दोन बैठकाही झाल्या आहेत. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. अजूनही मदत व पुनर्वसन विभागाने दरड कोसळण्याच्या संभाव्य धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करण्याचं काम महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटरकडे सोपवलेलं नाही. त्यामुळे सरकार माळीन, तळीये आणि इर्शाळवाडीनंतर आणखीही गावं जमिनीत गाडली जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.




















