एक्स्प्लोर
Maharashtra Rains | रायगडला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
मुंबई उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले, वाहतुकीवर परिणाम झाला. वसई-विरार आणि नालासोपारा शहरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, बुलढाणा आणि कोकण विभागातील महाविद्यालयांसह अनेक जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पुढील चोवीस तास धोक्याचे असून, कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर असून, चिपळूणमधील वशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पुराचा मोठा फटका बसला. चार गावांमध्ये २९३ लोक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यापैकी २२५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हसनाल गावात वाहून गेलेल्या पाचपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले. हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराची टीम बचावकार्यात सहभागी झाली. नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण




















