एक्स्प्लोर
Voter List Scam: मतदार याद्यांमधील घोळ, सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला
आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आणि निकालांमध्ये अनेक अडचणी आल्या', त्यामुळे आगामी निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, अशी मागणी हे नेते करणार आहेत. या शिष्टमंडळात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि इतर पक्षांचे नेतेही सहभागी होणार असून, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा या भेटीचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement

















