Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, भाजपचे ठाकरेंना सवाल
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन सुरु असलेला वाद पाहता प्रकाश आंबेडकरांनी मजारीला भेट देणं म्हणजे नव्या वादाला तोंड फुटलंय.. यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधलाय.
कारण प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आहेत. तर मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर संभाजीनगरमधील भद्रा मारुती मंदिरामध्ये पोहचले.. आणि मारूतीचं दर्शन घेतलंय.. प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात आलाय.. भाजप नेत्यांनी आंबेडकरांसह ठाकरेंवरही टीका केलीय..























