(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis LIVE Update : 16 आमदार अपात्र होणार की अभय मिळणार ? : ABP Majha
ज्यादिवशी महाराष्ट्रात थरारक आणि अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरू झाला. १० महिन्यांनंतर या सत्तासंघर्षाचा महानिकाल आज लागणारेय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, शिवसेनेसह ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला. उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र?, शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.