एक्स्प्लोर
Voter List Row: 'ज्यांची नोट चोरी बंद झाली, ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत', Fadnavis यांचा टोला
महाराष्ट्रात मतदार यादीतील (Voter List) कथित घोळावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोठ्या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. 'ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत', असा थेट टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे. त्यांनी विरोधकांचा हा मोर्चा म्हणजे निवडणुकीतील पराभवाची भीती असून, हे 'कव्हर फायर' असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप नेते नवनाथ बन यांनी या मोर्चाला 'फॅशन शो' संबोधून तो फ्लॉप ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या मोर्चात शिवसेना (UBT), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (SP), मनसे आणि इतर डावे पक्ष सहभागी होणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















