Omicron COVID-19 variant : दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे राज्य सरकार सतर्क ABP Majha
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंट या सगळ्याला पुन्हा ब्रेक लावणार की काय अशी स्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व विभागांची बैठक घेणार आहेत. तर राज्य सरकारनं आता कठोर नियमावलीही जाहीर केली आहे. एकीकडे १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली होती. तर पुण्यात सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची तयारी झाली होती. पण नव्या व्हेरियंटमुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं लसीकरणासंदर्भात कडक धोरण अवलंबलं आहे. दुकानं, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रवेश देताना लशीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.. मुंबईतही या व्हेरियंटचा एक जरी रुग्ण आढळला तर इमारत सील केली जाणार आहे..