Maratha Reservation : उद्याच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरेंचा मुद्दा येण्याची शक्यता कमी, कारण काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी (दि.19) विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष कायदा केला जाणार आहे. दरम्यान, उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरु
सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरु असून लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.





















