Maharashtra : राज्य सरकारी कामगार आजपासून संपावर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग
राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून पुढील दोन दिवस विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिलाय. जुनी पेन्शन योजना लागू करावी या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. काल राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये बैठक संपन्न झाली. मात्र बैठकीतही मागण्यांबाबात तोडगा निघाला नसल्याानं कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. आज सकाळी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक होणार आहे.. आणि त्यानंतर संपाबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आजच्या या संपामुळे परिचारिकांच्या सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारी सेवेअंतर्गत येणाऱ्या परिचारिकारीही आजच्या संपात सहभागी झाल्या आहेत.. दुसरीकडे आझाद मैदानावर आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी अँप, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. मुंबई, ठाणे, पालघर रायगड इत्यादी जवळच्या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी आजपासून तीन दिवस आंदोलन करणार आहेत.