एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Electoral Roll Row: 'अशी बोगस नावं का काढत नाही?' आमदार Sanjay Gaikwad यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल
बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan), संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि वंदना म्हात्रे (Vandana Mhatre) यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. 'अरे ही जी डबल डबल नावं ही तुम्ही का काढत नाही, असा कोणता भारताचा कायदा आहे, कोणता संविधान असतं की अशी बोगस नावं तुम्ही कायम ठेवता आहात?', असा थेट सवाल आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार असल्याचा दावा गायकवाड यांनी केला, तर गंगापूर मतदारसंघात ३६ हजार नावे दुबार आढळल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नाही, तर १३ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीचे नावही मतदार यादीत असल्याचं त्यांनी उघड केलं. पैसे घेऊन बनावट मतदारांची नोंदणी केली जाते आणि मतदानाच्या दिवशी त्यांना आणून मतदान करून घेतलं जातं, ज्यामुळे उमेदवारांना फटका बसतो, असा आरोप भाजपच्या वंदना म्हात्रे यांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement


















