एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Devendra Fadnavis वास्तव भाग 35 : देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाजूला होण्याची भाषा का केली?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. हा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे डॅमेज कंट्रोल करुन विरोधकांच्या टीकेची धार बोथट करुन टाकल्याचे बोलले जात आहे.

फडणवीसांनी इतका अनपेक्षित निर्णय का घेतला?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातच नव्हे देशभरातील भाजप पक्षसंघटनेत मोठे बदल होतील, अशी चर्चा आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील झाले तेव्हाही देवेंद्र फडणवीसांचा सूर सरकारबाहेर राहून काम करण्याचाच होता. पण भाजप पक्षश्रेष्ठींच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. पण कालच्या निकालानंतर एक स्पष्ट झाले की, यामुळे विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसू शकतो, याचा अंदाज देवेंद्र फडणवीसांना आला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी जोमाने काम करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भाजपला उभारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर राहून पक्ष वाढवायचा आहे, असे सांगितले जाते. 

लोकसभा निकालानंतर मविआचं मोमेंटम विधानसभेला तोडण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहण्याची चिन्हं आहेत. मविआचा हा विजयी मोमेंटम तोडायचा असेल तर आणि भाजपला पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची भूमिका घेतली असावी. आता पक्षश्रेष्ठी फडणवीसांचा हा निर्णय मान्य करतील का, हे पाहावे लागेल. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्याऐवजी सरकारमध्ये भाजपमधील कोणत्या नेत्याची निवड होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaDevendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget