Maharashtra Coronavirus | जळगाव शहरात 3 दिवसांच्या जनता कर्फ्यू
कोरोना रुग्ण वाढत असल्यानं जळगाव शहरात ३ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ३ दिवशी जनता कर्फ्यू असणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या संद्भातील आदेश दिलेत. या ३ दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठ बंद राहणार आहे. ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज बाजार, सर्व दुकाने, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनीक कार्यक्रम, सिनेमागृहे, व्यायामशाळा, तरणतलाव बंद राहणार आहेत. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे.




















