Maharashtra Corona second wave | जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट? दिवाळीत प्रदूषण वाढल्यास धोका वाढणार
पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. "सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे," असं आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटलं आहे.
5 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्र्यांसह झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली होती. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसर राज्यभरातही खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं मत यावेळी मांडण्यात आलं. त्यानंतर आरोग्य सेवा संचलनालयाने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला सूचना देऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
