(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती नाही, राज्यातील Corona Positivity Rate 5% च्या आत
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. अशातच कोरोना संदर्भातील एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना संदर्भात राज्यात दिलासादायक परिस्थिती आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हे हे पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेटच्या खाली गेल्याची माहिती आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको असे स्पष्ट केले आहे.
राज्यात काल 21 सप्टेंबर रोजी सुमारे 36 लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक असून ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. लसीकरणामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको असे स्पष्ट केले.
सध्या राज्यात तिसरी लाट संदर्भातली परिस्थिती नाही मात्र गणेशोत्सव काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. त्यामुळे काही दिवस काळजी घ्यावी लागणार असे देखील आरोग्य विभागाने म्हटले आहे.