एक्स्प्लोर
Maha Civic Polls: मुंबईसह 29 महापालिकांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम बदलला
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीचा कार्यक्रम बदलला आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, 'प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी आता १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल'. यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्यक्रमानुसार, मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत २२ नोव्हेंबरपर्यंत असेल. प्राप्त झालेल्या हरकती निकाली काढून ६ डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, ८ डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मतदार नोंदणीसाठीच्या कट-ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















