Jaya Shetty Case मध्ये Chhota Rajan ला जन्मठेप, काय होतं प्रकरण?
Jaya Shetty Case मध्ये Chhota Rajan ला जन्मठेप, काय होतं प्रकरण?
- जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी
- विशेष सीबीआय कोर्टाकडून छोटा राजन दोषी
- छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
- सीबीआय कोर्टाकडून छोटा राजनला दुसरी जन्मठेप
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी सुनावली शिक्षा. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच छोटा राजनला दहा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणानंतर छोटा राजनला सीबीआय कोर्टानं सुनावलेली ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा आहे.





















