Laxmi Poojan Muhurta : लक्ष्मीपूजनासाठी दिवसभरात तीन मुहूर्त,जाणून घ्या कोणते?
Laxmi Poojan Muhurta : लक्ष्मीपूजनासाठी दिवसभरात तीन मुहूर्त,जाणून घ्या कोणते?
दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुस-यादिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे. त्याप्रमाणे यावर्षी शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात म्हणजे सायं. 6-4 पासून रात्री 8-35 पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे.
1962, 1963 आणि 2013मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुस-या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले होते असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.
दिवाळीत लक्ष्मीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच घर, मंदिर, कार्यालय आणि दुकानात लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हालाही या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिला आवडीच्या वस्तू अवश्य अर्पण करा. लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू आवडतात. तुम्हालाही या दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तर तुम्ही तिचे आवडते पदार्थ तयार करू शकता. असे मानले जाते की देवी लक्ष्मीला पांढऱ्या वस्तू खूप आवडतात. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या आनंदासाठी काय बनवावे.