Lalit Patil Case : डॉ. अमेय ठाकूर यांचा बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापदाचा राजीनामा ABP Majha
Lalit Patil Case : डॉ. अमेय ठाकूर यांचा बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापदाचा राजीनामा ... ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या मुलाचाही राजीनामा, डॉ. अमेय ठाकूर यांचा बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापदाचा राजीनामा, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर पदमुक्त
पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात पदमुक्त करण्यात आलेले ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांच्या मुलाने राजीनामा दिला आहे. डॉ. अमेय ठाकूर (Dr. Amey Thakur) असे मुलाचे नाव असून ते बी जे मेडिकल कॉलेजमध्ये (B J Medical College) प्राध्यपक म्हणूक कार्यरत होते. त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण समोर न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
डॉक्टर संजीव ठाकूर पुण्यात ससून रुग्णालयाचे डीन म्हणून रुजू झाल्यानंतर डॉक्टर अमेय ठाकूर हे बी जे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी डॉक्टर संजीव ठाकूर सोलापूरला शासकीय रुग्णालयात डीन म्हणून असताना डॉक्टर अमेय ठाकूर तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ज्याला सोलापुरातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. डॉक्टर अमेय ठाकूर यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती त्यांचे वडील डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या प्रभावातून झाल्याचा आरोप होत होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.