एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan : समुद्राला भरती, लालबागच्या राजाच्या विसर्जनात मोठा अडथळा
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाला आहे. समुद्रामध्ये मोठी भरती आल्यामुळे विसर्जन रखडले आहे. "भरती असल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये ही अडचण निर्माण झालेली आहे," असे सांगण्यात आले. ओहोटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. लालबागच्या राजाची मिरवणूक काल साधारण बाराच्या सुमारास सुरू झाली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यावेळी भरतीची वेळ सुरू झाली होती आणि पाणी चढायला लागले होते. त्यामुळे बाप्पाची मूर्ती तराफ्यावर व्यवस्थित येऊ शकली नाही. यंदा स्वयंशलित असा अत्याधुनिक तराफा वापरण्यात येत आहे. मात्र, या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत आहेत. हायड्रोलिक्स संदर्भातही अडचण आल्याचे बोलले जात आहे, परंतु याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ओहोटी साधारणपणे तीन ते चार तासानंतर येईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडेल. गिरगाव चौपाटीवर अजूनही गर्दी कमी झालेली नाही. कोळी बांधवांच्या बोटी देखील समुद्रात उतरल्या आहेत आणि त्यांच्याकडून तराफ्यावर मूर्ती ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















