Ladki Bahin Yojana : फॉर्म भरून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याचे कारण? ABP Majha
राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झालीये.... जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत... नातेवाइक, मैत्रिणी तसेच शेजारीणीच्या खात्यावर पैसे आले आल्यावर तुम्ही ऐकलचं असेल...पण अनेक महिलांना फॉर्म भरून देखील पैसे आले नाही.. त्यामुळे या महिला सेतू केंद्र आणि बँकेत गर्दी करत आहेत..
पैसे न येण्याचे कारण कोणते?
पैसे न येण्याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे. त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावे लागणार आहे.... आधार कार्ड बँकेशी लिंक कसे करावे याची माहिती मी तुम्हाला कामाची गोष्ट क्रमांक 13 मध्ये सांगितली आहे.. ते पाहून तुम्ही आधार लिंक करू शकता...
आता तुम्हाला फॉर्म नव्याने भरावं लागणार का?
अनेक महिलांनी फॉर्म भरून देखील पैसे न आल्याने महिला आता सेतू केंद्रावर जाऊन नव्याने फॉर्म भरण्याबाबत विचारपूस करत आहे.. पण जर तुम्हाला अप्रुव्हचा मॅसेज आला असेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही... तुम्हाला फक्त आधार कार्ड लिंक करायचं आहे...
दोन महिन्याचे पैसे मिळणार का?
आता बऱ्याच महिलांना असं वाटत आहे की, दोन महिन्यांचे तीन हजार रूपये आले नाहीत.. मग आता हे पैसे मिळतील का? पण ज्या महिलांचा फॉर्म अप्रुव्ह झालाय... अशा सर्व महिलांना या महिन्यात पैसे आले नसतील तर पुढच्या महिन्यात किंवा या महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे येऊ शकतात, अशी चर्चा आहे...