Ladki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? New Update
लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालीये.... पण अनेक जणांचे बँक खाते आधारशी लिंक नाही... तर आजच्या या व्हिडिओतून आपण बँक खाते आधारला घरबसल्या कसे लिंक करायचे त्याची ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत.
सर्वात आधी तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईट वरती जावं लागेल.
१. त्यासाठी गुगल वरती सर्च करा my adhar
२. आता तुमच्यासमोर माय आधार ची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
३. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड लॉगिन करायचं. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपच्या भरावा लागेल.
४. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी तो तिथे टाका.
5. ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार वेबसाईट वरती लॉगिन झालात.
6. आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
7. आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा.
8. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाता ऍक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल. त्यामध्ये बऱ्याच जणांचा अकाउंट हा आधार कार्ड ची लिंक नाही तर तिथे डी ऍक्टिव्ह असं येत आहे.
आता आपण आधारला बँकेची लिंक कसं करायचं ते समजून घेऊया?
1. सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती Npci असं सर्च करायचं.
2. त्यानंतर खाली रिझल्ट मध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचं.
4. आता तुमच्यासमोर खाली आणि ऑप्शन आले असतील पण तुम्हाला Bharat Aadhar seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचं.
5. आता तुमच्यासमोर आणखी एक पेज आला असेल. त्यावर आधार कार्ड नंबर टाका. खाली request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा.
6. त्यानंतर खाली तुम्हाला तुम्हाला ज्या बँकेचा खाते लिंक करायचा आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचा आहे.
7. बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
8. टम्स अँड कंडिशन याला एक्सेप्ट करून खाली एक कॅपच्या कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा.