Monsoon : पंचगंगेच्या पाण्यानं पात्र ओलांडलं; किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईसह राज्यातील बहुतांश भागातं पावसानं विश्रांती घेतली असली तरीही सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे जलस्त्रोतांचे स्तर वाढले आहेत. तिथे कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या जलपातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाण्यानं नदीपात्र ओलांडलं आहे. यामुळं नदीकाठी असणाऱ्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये पुर आणि पावसाचा कोल्हापुराला आलेला अनुभव पाहता 39 फुटांच्या इशारा पातळीपर्यंत नदीचं पाणी आल्यास नेमकं काय करावं यासंदर्भातील सुचना पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत.























