Kolhapur District Bank Election Result:विरोधी आघाडीनं घाम फोडला, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर विजयी
कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. मात्र ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलला घाम फोडला आहे. सध्या शिवसेना गटाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार सेनेच्या बाजूचे झाले आहेत. तर सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीआधीच सहा जण बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर राहील असा दावा संजय मंडलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. आमदार प्रकाश आवडे त्याच बरोबर काही विद्यमान संचालक देखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत अबिटकर बंधूंवर जोरदार टीका झाली. यांच्यामुळेच निवडणूक लागली अशी सत्ताधारी गटाने टीका केली होती. मात्र आपण उमेदवारीसाठी पात्र होतो हे अर्जुन अबिटकर यांनी दाखवून दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज




















