एक्स्प्लोर
Kishtwar Cloudburst: ६० मृत्यू, अनेक बेपत्ता; बचावकार्य सुरु
किश्तवाडच्या चशौती गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत साठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकशे सात लोक जखमी झाले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुरामधील गाळामध्ये अनेकजण दबून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांची कुटुंब बेपत्ता झाली आहेत. किश्तवाडच्या चशौती गावात बचाव आणि मदत कार्य सुरु आहे, पण दुसरीकडे लोक आपल्या आप्तजनांना शोधण्यासाठी धडपडत आहेत. माता मचेलच्या दर्शनासाठी आलेली अनेक कुटुंबे या दुर्घटनेत विखुरली आहेत. एका महिलेने सांगितले, 'ते लंगर खात होते, लंगर खात असल्याचे सांगितले. कालपासून ते सापडले नाहीत.' ती महिला आपल्या मुलीला आणि पतीला शोधत आहे. ते दहा तारखेला दर्शनासाठी आले होते आणि काल परत येत होते. अनेकांचे फोन बंद येत असल्याने कुटुंबीयांचा संपर्क तुटला आहे. या मलब्यात लोक आपल्या घरच्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा हजारो व्यथित लोकांची छायाचित्रे इथे आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
चंद्रपूर
Advertisement
Advertisement

















