एक्स्प्लोर
War of Words: 'बच्चू कडू (Bacchu Kadu) अज्ञानी, त्यांना कृषी संकट कळत नाही', किशोर तिवारींचा (Kishor Tiwari) घणाघात
शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहेत, पण अज्ञानी आहे. कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही,' असे खळबळजनक वक्तव्य तिवारी यांनी केले आहे. राज्यमंत्री दर्जाचे पद हवे होते, ते न मिळाल्याने कडू आता आंदोलन करत असल्याचा गंभीर आरोप तिवारींनी केला. बच्चू कडू आंदोलन सुरू करतात आणि नंतर ते गुंडाळून घेतात, असा अनुभव असल्याचेही तिवारी म्हणाले. नागपुरात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'महाएल्गार आंदोलन' सुरू केले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिवारींनी ही टीका केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
















