एक्स्प्लोर
Pune Khadakwasla Dam : पुण्याला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण भरलं, विसर्ग सुरू
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या २५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, यामुळे मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीलगतच्या काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनाने नदीपात्रात उभ्या असलेल्या गाड्या काढण्याचे आवाहन केले आहे. पोलीस सतत गस्त घालत असून, 'कुणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये' यासाठी प्रयत्न करत आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या २७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाईल. त्यामुळे नदीलगतच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















