Beed : Karuna Sharma परळी पोलिसांच्या ताब्यात, करुणा शर्मांच्या गाडीत आढळलं होतं पिस्तुल
Beed : परळी मध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा शर्मा पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात काय असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे यांनी माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली या मुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले आहे. परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.























