Jitendra Awhad Bhai Jagtap MVA Sabha : मविआच्या सभेत जितेंद्र आव्हाड, भाई जगतापांची टोलेबाजी
Jitendra Awhad Bhai Jagtap MVA Sabha : मविआच्या सभेत जितेंद्र आव्हाड, भाई जगतापांची टोलेबाजी
मुंबईतल्या बीकेसीच्या मैदानात आज महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत सर्वच प्रमुख नेत्यांनी एकीचा सूर आळवला. नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनीही महाविकास आघाडीत एकी ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिल्याचं भाई जगतापांनी सांगितलं. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वज्रमूठ सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. आपण आत जाऊन आलोय, त्यामुळं कुणाच्या बापाला घाबरत नसल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला. मुंबई महापालिकेच्या कोट्यवधींच्या ठेवींवर भाजपचा डोळा असल्याची टीका आदित्य ठाकरे आणि अशोक चव्हाणांसह इतरही नेत्यांनी केली. मविआतली एकी टिकवण्यासाठी एखादं पाऊल मागेपुढे झालं तरी, कार्यकर्ते आणि वरिष्ठांनी समजुतीची भूमिका घेऊन आघाडीतलं ऐक्य टिकवण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं. उद्धव ठाकरेंनी येत्या सहा मे रोजी आपण बारसूत जाणार असल्याचं सांगून नारायण राणेंनी दिलेलं आव्हान स्वीकारलं.
महत्त्वाच्या बातम्या























