एक्स्प्लोर
Jarange Fadnavis Row : आधी घसरले, मग नरमले Special Report
बीडच्या मांजरसुंबा गावात झालेल्या सभेत मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केला. यामुळे भाजपा नेत्यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगेंनी आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवली आहे का, असा सवाल भाजपा नेत्यांकडून विचारण्यात आला. जरांगेंनी सभेत डीजे बंद केल्याचा आरोप पोलिसांवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. मुख्यमंत्रीपदी असलेल्या फडणवीसांवर बोलताना शिवराळ भाषेचा वापर केल्याने भाजपा नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील जनता जरांगेंना कधीही माफ करणार नाही, असेही काही नेत्यांनी म्हटले. नितेश राणे यांनी जरांगेंना जीभ काढून हातात देण्याचा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले. चौफेर टीका झाल्यानंतर मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरलेले शब्द मागे घेतले. "मी बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो," असे जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी अनेकदा उपोषण करणाऱ्या जरांगेंनी पातळी सोडून भाषा वापरल्यास नायकाचा खलनायक व्हायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. जरांगेंनी २९ तारखेला मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















