एक्स्प्लोर
Buldhana Engineer Case | अतिक्रमण पाहणीला गेलेल्या नगर अभियंत्याला मारहाण, तलवारीची धमकी
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले नगर अभियंता रवी पारसकर यांना अतिक्रमण पाहणीदरम्यान मारहाण करण्यात आली आहे. पालीखेळ या भागात अतिक्रमणाची तक्रार असल्याने रवी पारसकर आपल्या पथकासह पाहणीसाठी गेले होते. यावेळी आरोपी माणिक वाघ याने नगर अभियंत्याला जबर मारहाण केली. तसेच, अश्लील शिविगाळ करत 'तलवारीनं कापून टाकण्याची धमकी सुद्धा यावेळी वाघ यांनी दिलेली आहे.' याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांत माणिक वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी माणिक वाघ हा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांचा भाऊ असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी उपसभापती देखील आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्याला मारहाण केल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















