Naxal Ashok Reddy : जहाल नक्षलवादी अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ कुशनाम उर्फ महेश याला अटक
महाराष्ट्रात नक्षलवादाचं विषारी बीज रोवणाऱ्या जहाल नक्षलवादी अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ कुशनाम उर्फ महेश याला अटक करण्यात आलीय. मध्य प्रदेश एटीएसने जबलपूरमध्ये अशोक रेड्डी आणि त्याच्या पत्नीला अटक केलीय. अशोक रेड्डीसाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाखोंचं बक्षीस होतं. नक्षली कमांडर अशी ओळख असलेला अशोक रेड्डी हा मूळचा तेलंगणाचा आणि तीन दशकांपूर्वी त्याने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादाचा छुपा प्रचार केला. आता नागपूर पोलिसांचं पथक चौकशीसाठी जबलपूरला गेलंय. खरंतर २००७ मध्ये अशोक रेड्डीला नागपुरातील दीक्षाभूमीजवळ नक्षली साहित्यासह अटक झाली होती. मात्र, सुटकेनंतर तो पुन्हा नक्षली कारवायांमध्ये सक्रिय झाला आणि नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबूझमाड परिसरात राहून नक्षली कारवायांना बळ देत होता. त्याच्या अटकेनंतर नक्षल्यांची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळू शकेल.