Jitendra Awhad : जग्गी महाराजांनी शिवरायांबद्दल चुकीची माहिती सांगितली : जितेंद्र आव्हाड
सद्गुरू जग्गी महाराज यांनी इतिहासाचं विकृतीकरण करू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय... संत रामदास हे शिवरायांचे गुरू होते... त्यांना भिक्षा मागताना पाहून शिवरायांनी त्यांचे राज्य आणि स्वताला रामदारांच्या चरणी अर्पण केलं...
आणि रामदारांच्या आज्ञेने ते राज्य सोडून हाती कटोरी घेऊन भिक्षा मागू लागले... पुढे रामदासांनी स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देऊन त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले... आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले... या चुकीच्या वक्तव्याबद्दल जग्गी महाराजांनी माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय




















