Nitish Kumar: थर्ड फ्रण्ट नाही, मेन फ्रण्ट बनायचं आहे- नितीश कुमार ABP Majha
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट घेतली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, भाजपवाले संपूर्ण देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे एकजुट होणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. माझी वैयक्तीक काहीही इच्छा नाही. सर्वांनी एकत्र येणं गरजेच असून हे देशहितासाठी असेल, असंही नितीश कुमार यांनी म्हटलंय. याआधी नितीश कुमार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली होती. दरम्यान आज नितीश यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे भाजपविरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर नितीश कुमार यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदही घेतली.




















