नव्या आर्थिक वर्षात खिशाला महागाईची फोडणी New homes, Electronic Devices , गुंतवणूक, Mobile महाग
आज एक एप्रिल म्हणजे आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात... पण या नव्या आर्थिक वर्षात तुमच्या खिशाला महागाईची फोडणी बसणार आहे. कारण आता नवी घरं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, गुंतवणूक, मोबाईल, हे सारं काही महागणार आहे... अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवे कर आजपासून लागू होत आहेत. त्यानुसार आजपासून क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर ३० टक्के करआकारणी होणार आहे. नवं घर खरेदी करतानाही जरा अधिकचा खिसा मोकळा करावा लागेल कारण दोन वर्षांनंतर रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. तसंच मोठ्या शहरात नव्या घरांवर मेट्रोचा सेस लागणार आहे.. त्यामुळे नव्या घरांच्या किमीती वाढणार आहेत. आजपासून लागू होणाऱ्या नव्या आयात शुल्कामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, मोबाईल, हेडफोन्स, एलईडीबल्ब यांच्या खरेदीमुळे खिशाला कात्री लागणार आहे. चांदीवरील आयात शुल्कात बदल झाल्यानं चांदीची भांडी, दागिने महाग होणार आहेत..